Pranali Kodre
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे नेहमीच चर्चेत राहणारे सेलिब्रेटी जोडपे आहे.
विराटने आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटनंतर कसोटीतूनही निवृत्ती घेतली असल्याने आता त्याच्याकडे कुटुंबासोबत अधिक वेळ मिळत आहे.
विराट आणि अनुष्का आता त्यांच्या मुलांसह लंडनमध्ये राहतात.
नुकताच विराट आणि अनुष्का यांचा लंडनच्या रस्त्यांवर सहज फिरतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.
चाहत्यांनी त्यांच्या नकळत हा व्हिडिओ शूट केला असून यामध्ये दोघेही कॅज्युएल ड्रेसमध्ये दिसत आहेत. अनुष्काने पँट आणि टॉप असा पोषाख घातला आहे, तर विराट टी-शर्ट आणि शॉर्ट घातला आहे.
तसेच विराटच्या हातात छत्री आणि पाण्याची बाटली आहे. यावेळी ते काही स्थानिक लोकांशी हसून बोलताना व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये विराट-अनुष्कासोबत त्यांची मुलं नव्हती.
विराट आता ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे मालिकेत भारताकडून खेळताना दिसू शकतो.