Pranali Kodre
भारताचा क्रिकेटपटू विराट कोहली आणि त्याची पत्नी व अभिनेत्री अनुष्का शर्मा हे नेहमीच चर्चेत राहणारं जोडपं आहे.
याशिवाय अनेकांसाठी हे आदर्श जोडपं असून त्यांची जोडी प्रचंड लोकप्रिय आहे.
त्यामुळे त्यांना त्यांच्या सुरक्षेची काळजी घेण्यासाठी त्यांचा वैयक्तिक बॉडिगार्डही सोबत ठेवावा लागतो.
त्यांच्या बॉडीगार्डचं नाव प्रकाश सिंग असून तो सोनू नावानेही ओळखला जातो.
तो जवळपास २०१७ पासून अनुष्कासोबत असून तो आता विराटच्या सुरक्षेचीही काळजी घेतो.
याशिवाय सोनू विराट आणि अनुष्काच यांची मुलं वामिका आणि अकाय यांचे फोटो कोणी चोरून काढू नये, याचीही काळजी घेत असतो.
एकूणच विराटच्या कुटुंबाच्या सुरक्षेची काळजी घेण्याची जबाबदारी सोनूवर असून त्याला त्याचा बक्कळ पगारही मिळतो.
काही मिडिया रिपोर्ट्सनुसार सोनूला वर्षाला १.२ कोटी रुपये पगार मिळतो.