सकाळ वृत्तसेवा
टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली बऱ्याच काळापासून खराब फॉर्मशी झुंज देत आहे.
सोशल मीडियावर अनेकदा वर्चस्व गाजवत इन्स्टाग्राम पोस्टसाठी कोहली सर्वाधिक शुल्क घेतो.
इंस्टाग्रामवरील एका पोस्टवरून सर्वाधिक कमाई करणाऱ्या आशियाई खेळाडूंमध्ये कोहली अव्वल आहे.
एकूण खेळाडूंच्या यादीत कोहली जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.
विराट कोहली त्याच्या प्रत्येक इंस्टाग्राम पोस्टवरून 8 कोटी रुपये कमावतो.
कोहलीचे सध्या 20 कोटींहून अधिक फॉलोअर्स आहेत.
इतकेच नाही तर गेल्या वर्षी 100 मिलियन फॉलोअर्स पूर्ण करणारा विराट पहिला भारतीय ठरला आहे.