Sandip Kapde
विराट कोहलीची फॅनफॉलोइंग जगभरात अफाट असून तो इंस्टाग्रामवर २७४ मिलियन फॉलोअर्ससह आघाडीवर आहे.
सोशल मीडियावर विराट कोहलीचे नाव नेहमीच ट्रेंडमध्ये असते, त्याच्या प्रत्येक हालचालीकडे चाहत्यांचे लक्ष असते.
विराट कोहली एका इंस्टाग्राम पोस्टसाठी तब्बल १२ कोटी रुपये घेतो, हे आकडे ऐकून कोणीही थक्क होईल.
महेंद्रसिंह धोनी एका पोस्टसाठी फक्त १.५ कोटी रुपये कमावतो, म्हणजेच विराट त्याच्यापेक्षा ११ पट जास्त कमावतो.
देशात केवळ दोन क्रिकेटपटूंनी इंस्टाग्राम पोस्टमधून करोडोंची कमाई केली आहे – विराट आणि धोनी.
या यादीत रोहित शर्मा तिसऱ्या क्रमांकावर असून तो एका पोस्टमधून ७६ लाख रुपये कमावतो.
हार्दिक पंड्या ६५ लाख रुपये एका पोस्टसाठी चार्ज करतो आणि त्याची सोशल मीडियावर चांगलीच लोकप्रियता आहे.
सुरेश रैनाही या यादीत आहे, तो एका पोस्टसाठी ३४ लाख रुपये घेतो.
आरसीबीने जेव्हा आयपीएल २०२५ जिंकले तेव्हा सोशल मीडियावर विराट कोहलीचा बोलबाला होता.
टी२० वर्ल्ड कप २०२४ नंतर विराट कोहलीच्या ट्रॉफीसोबतच्या फोटोने इंटरनेटवर धुमाकूळ घातला होता.
विराट कोहलीच्या सोशल मीडिया पोस्ट्समुळे ब्रँड्सला प्रचंड पोहोच मिळते, त्यामुळेच तो इतका महाग आहे.
भारताचा 'किंग कोहली' सोशल मीडियाचा देखील बादशहा बनलेला आहे.