Pranali Kodre
१८ ऑगस्ट २००८, भारतीय क्रिकेटमध्ये एका अशा खेळाडूने पाऊल ठेवलं, जो पुढे फक्त चमकलाच नाही, तर त्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेट अक्षरशः गाजवलं. तो खेळाडू म्हणजे, विराट कोहली!
Virat Kohli Debut
Sakal
१९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकून भारताच्या संघात विराटने वयाच्या १९ व्या वर्षी पाऊल टाकलं होतं. तेव्हा कुणालाच कल्पना नव्हती की हा युवा खेळाडू भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील महान खेळाडूंपैकी एक बनेल.
Virat Kohli Debut
Sakal
विराटपासून... रनमशीन... आणि मग ‘किंग कोहली’पर्यंत...! पण या ऐतिहासिक प्रवासाची सुरुवात नेमकी कशी झाली? ती झाली होती, १८ ऑगस्ट २००८ रोजी श्रीलंकेविरुद्ध डंबुला इथं झालेल्या वनडे सामन्यात.
Virat Kohli Debut
Sakal
त्या सामन्यात विरेंद्र सेहवाग अन् सचिन तेंडुलकर खेळणार नव्हते, त्यामुळे तत्कालिन कर्णधार धोनीनं विराटला थेट ओपनिंगची संधी दिली अन् विराटने गौतम गंभीरसोबत भारताच्या डावाची सुरुवात केली.
Virat Kohli Debut
Sakal
मात्र दुसऱ्याच बॉलवर गंभीर आऊट झाला अन् विराटलाही नुवान कुलसेकरानं अवघ्या १२ धावांवर LBW करत माघारी धाडलं.
Virat Kohli Debut
Sakal
त्या सामन्यात भारताचा संघ १४६ धावांवर ऑलआऊट झाला अन् नंतर श्रीलंकेने ८ विकेट्सने तो सामना जिंकला.
Virat Kohli Debut
Sakal
त्या मालिकेत विराट खेळला अन् त्यानं चौथ्या सामन्यात पहिलं अर्धशतकही केलं.
Virat Kohli Debut
Sakal
त्यावेळी भारतीय वनडे संघात सेहवाग, सचिन, गंभीर, युवराज आणि धोनीसारखे दिग्गज फलंदाज होते, पण विराटने या ताऱ्यांच्या गर्दीत स्वतःचं स्थान निर्माण करायला फार वेळ लावला नाही.
Virat Kohli Debut
Sakal
आज वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकांचा विक्रम विराटच्या नावावर आहे, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिननंतर सर्वाधिक शतकं करणारा फलंदाज आहे, त्याने २६ हजारांहून अधिक आंतरराष्ट्रीय धावा केल्या आहेत.
Virat Kohli Career
Sakal
१८ वर्षांपूर्वी डंबुलामध्ये १२ धावांवर बाद झालेल्या त्याच विराटच्या नावाचं दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर पॅव्हेलियन आहे. या प्रवासाला आता १८ वर्षे झालीत.
Virat Kohli Debut
Sakal
Devdutta Padikkal
Sakal