Pranali Kodre
भारताचा स्टार खेळाडू विराट कोहली आणि इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केविन पीटरसन चांगले मित्र आहेत.
विराट आणि पीटरसन रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून आयपीएलमध्ये एकत्र खेळले देखील आहेत.
नुकतेच भारत आणि इंग्लंड संघाच फेब्रुवारी २०२५ च्या सुरुवातीला झालेल्या वनडे मालिकेदरम्यान त्यांची भेट झाली होती.
पीटरसन या मालिकेत समालोचन करत होता, तर विराट भारतीय संघाचा भाग होता.
यावेळी विराटने पीटरसनचा मुलगा डायलन याच्यासाठी खास भेट दिली आहे.
विराटने डायलनसाठी त्याची जर्सी स्वाक्षरी करून दिली आहे. तसेच त्याला शुभेच्छाही दिल्या आहेत.
पीटरसनने घरी गेल्यावर मुलाचा विराटची जर्सी घातलेला फोटो शेअर केला असून याबाबत विराटचे आभारही मानले आहेत.