सकाळ डिजिटल टीम
भारतीय संघ आज बांगलादेशविरूद्ध चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील पहिला सामना खेळत आहे.
या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने ४१ धावांची खेळी केली.
तर माजी कर्णधार विराट कोहलीला सामन्यात अवघ्या २२ धावा करता आल्या.
या २२ धावांसह विराटच्या ICC स्पर्धांमधील ३६१६ विक्रमी धावा पूर्ण झाल्या.
वन-डे वर्ल्ड कप, ट्वेंटी वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी या आयसीसी स्पर्धेत सर्वाधिक धावांच्या विराटच्या विक्रमाच्या आसपास जगातील कोणताच खेळाडू नाहीय.
या यादीत ३६१६ धावांसह विराट कोहली अव्वल स्थानी आहे.
दुसऱ्या स्थानी ३२७६ धावा करणारा रोहित शर्मा आहे. रोहित विराटच्या विक्रमापासून ३४० धावा दुर आहे.
तिसऱ्या स्थानी २९४२ धावा करणारा ख्रिस गेल आहे.
२८७६ धावा करणारा कुमार संगकारा यादीत चौथ्या स्थानी आहे.