Pranali Kodre
आयपीएल २०२५ (IPL) स्पर्धेला ८ दिवसांच्या स्थगितीनंतर १७ मे रोजी पुन्हा सुरूवात होत आहे.
आयपीएल २०२५ मधील ५८ वा सामना रॉयल चॅलेंजर्सं बंगळुरूविरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाणार होता.
पण या सामन्यापूर्वी आयपीएल स्थगित असताना चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. विराट कोहलीने १२ मे रोजी कसोटीतून निवृत्ती घेतली.
त्याने अचानक कसोटी निवृत्ती घेतल्याने सर्वांना आश्चर्य वाटले होते. त्याला निवृत्तीचा सामनाही खेळता आला नाही.
त्यामुळे बंगळुरू - कोलकाता सामन्यापूर्वी चाहत्यांनी अनोख्या पद्धतीने त्याला मानवंदना दिली आहे.
काही चाहत्यांनी विराटची कसोटी कारकिर्द साजरी करण्यासाठी त्याच्या नावाची आणि १८ क्रमांकाची पांढरी जर्सी परिधान करून स्टेडियममध्ये हजेरी लावली आहे.
बंगळुरूमध्ये पाऊस असतानाही चाहते पांढरी जर्सी घालून स्टेडियममध्ये आल्याचे फोटो व्हायरल झाले आहेत.