Pranali Kodre
दिल्लीच्या एका सामान्य कुटुंबात जन्मलेला एक मुलगा, ज्याला लहानपणापासून क्रिकेटचं वेड होतं. घरच्यांनीही त्याच्या या स्वप्नाला साथ दिली. एक दिवस जगभरातील क्रिकेटप्रेमींच्या गळ्यातला ताईत बनेल, याची कदाचित तेव्हाच कुणालाच कल्पना नव्हती.
Virat Kohli Journey
१९८८ मध्ये जन्मलेल्या विराटने १९९८ मध्ये वेस्ट दिल्ली क्रिकेट अकादमीत बॅट हातात धरल्यापासून सुरू झालेला हा प्रवास आज इतिहासाच्या सुवर्ण पानांवर कोरला गेला.
Virat Kohli Journey
Sakal
वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी रणजी सामन्यात दिल्लीसाठी खेळत असतानाच रात्री त्याच्या वडिलांचे निधन झाले. पण दुःख उराशी बाळगूनही दुसऱ्या दिवशी सकाळी मैदानात उतरला आणि त्याने ९० धावांची खेळी केली. तरुण विराट, तिथूनच एका खऱ्या योद्ध्यासारखा घडत गेला.
Virat Kohli Journey
१९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकल्यानंतर २००८ मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण करणाऱ्या विराटने मागे वळून पाहिलेच नाही.
Virat Kohli Journey
Sakal
२०१४ मधील तो कठीण इंग्लंड दौरा असो, कर्णधारपदाचा ताण असो किंवा तब्बल तीन वर्षांचे ते कठीण अपयशाचे सत्र असो. विराटने प्रत्येक संकटावर आपल्या अफाट जिद्दीने आणि फिटनेसच्या जोरावर मात केली.
Virat Kohli Journey
Sakal
अनुष्का शर्माची खंबीर साथ आणि कुटुंबाचा आधार घेत त्याने २०२२ च्या आशिया कपमध्ये ७१ व्या शतकासह पुनरागमन केलं अन् त्यानंतर क्रिकेट जगतात पुन्हा एकदा विराटचे वर्चस्व सुरू झाले.
Virat Kohli - Anushka Sharma
आज त्याच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ८६ शतकं २८ हजारांहून अधिक आहेत. वनडेमध्ये तर तो महान फलंदाजांच्या पंक्तीत बसलाय. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये तो फक्त सचिन तेंडुलकरच्या मागे आहे.
Virat Kohli Journey
Sakal
नुकताच ३८ व्या वाढदिवसाच्या एक दिवस आधीच त्याने वनडेत धावांचा पाठलाग करताना सर्वाधिक धावा करण्याचा विश्वविक्रमही करत त्याला चेस मास्टर का म्हणतात, हे देखील दाखवून दिलं.
Virat Kohli Journey
Sakal
सुरुवातीच्या काळात प्रत्येक रागावर नियंत्रण नसलेला तो तरुण विराट, काळानुरूप परिपक्व खेळाडू बनला.
Virat Kohli Journey
Sakal
कसोटी आणि आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटला रामराम ठोकल्यानंतर, विराट आता केवळ अँकर रोल सांभाळणारा खेळाडू राहिलेला नाही, तर तो पूर्ण मुक्त होऊन आपल्या खेळाचा आक्रमक फटकेबाजी करत मनसोक्त आनंद घेतोय.
Virat Kohli Journey
Sakal
दिल्लीच्या गल्ल्यांमधून सुरू झालेला हा प्रवास आज नव्या उंचीवर पोहोचला म्हणूनच, क्रिकेटच्या या खेळात अनेक खेळाडू आले तरी 'किंग कोहली' चं स्थान हे कायम अबाधित राहणार आहे!
Virat Kohli Journey
Sakal
Rohit Sharma Set for Mumbai Indians Captaincy Return?
Sakal