Pranali Kodre
भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नुकतीच २-१ अशा फरकाने वनडे मालिका जिंकली. ही २०२५ वर्षातील भारताची शेवटची वनडे मालिका ठरली.
Team India
Sakal
या मालिकेत विराट कोहलीने ३ सामन्यांत १५१ च्या सरासरीने दोन शतके आणि एका अर्धशतकासह ३०२ धावा केल्या.
Virat Kohli
Sakal
विराटच्या या कामगिरीमुळे त्याला मालिकावीर पुरस्कारही देण्यात आला. विराटचा हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील २२ वा मालिकावीर पुरस्कार ठरला.
Virat Kohli
Sakal
विराट आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक मालिकावीर पुरस्कार जिंकणारा खेळाडू आहे.
Virat Kohli
Sakal
मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असून त्याने २० वेळा मालिकावीर पुरस्कार जिंकला आहे.
Sachin Tendulkar
Sakal
बांगलादेशचा अष्टपैलू शाकिब अल हसन या यादीत तिसऱ्या क्रमांकावर असून त्याने १७ वेळा मालिकावीर पुरस्कार जिंकला आहे.
Shakib al Hasan
Sakal
दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज जॅक कॅलिसने १५ वेळा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मालिकावीर पुरस्कार जिंकला असून तो चौथ्या क्रमांकावर आहे.
Jacques Kallis
Sakal
डेव्हिड वॉर्नर आणि सनथ जयसूर्या हे या यादीत संयुक्तरित्या ५ व्या क्रमांकावर आहेत. दोघांनीही प्रत्येकी १३ वेळा मालिकावीर पुरस्कार जिंकला आहे.
David Warner - Sanath Jayasuriya
Sakal
Virat Kohli - Rohit Sharma
Sakal