Swadesh Ghanekar
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने १० वर्षांनी मुंबई इंडियन्सला वानखेडे स्टेडियमवर हरवले.
RCB च्या ५ बाद २२१ धावांच्या प्रत्युत्तरात मुंबईला ९ बाद २०९ धावा करता आल्या
विराट कोहलीने MI विरुद्ध ४२ चेंडूंत ८ चौकार व २ षटकारांच्या मदतीने ६७ धावांची खेळी केली.
ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये १३ हजार धावांचा टप्पा ओलांडणारा विराट हा पहिला भारतीय ठरला आहे.
आयपीएल २०२४ पासून ते आतापर्यंत या लीगमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांमध्ये विराट कोहली टॉपर आहे.
विराटनंतर साई सुदर्शन ( ७१८), ट्रॅव्हिस हेड ( ७१५), ऋतुराज गायकवाड ( ७०४) व निकोलस पूरन ( ७००)यांचा क्रम येतो.
आयपीएल २०२४ नंतर सर्वाधिक ५२ षटकार हे निकोलस पूरनने मारले आहेत. विराटने ४४ षटकार खेचले आहेत.