Pranali Kodre
रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघाने ३ जून रोजी पंजाब किंग्स संघाला पराभूत करीत आयपीएल २०२५ अजिंक्यपदाची माळ आपल्या गळ्यात घातली.
२००८पासून सुरु झालेल्या या स्पर्धेत बंगळूरला पहिल्यांदाच अजिंक्यपदाला गवसणी घालता आली. त्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघाने १८ वर्षांची विजेतेपदाची प्रतिक्षा संपवली.
गेली १८ वर्षे या संघाकडून खेळणाऱ्या विराट कोहलीसाठीही हे विजेतेपद खास राहिले.
विजेतेपद जिंकल्यानंतर विराटने पत्नी अनुष्कासह सेलिब्रेशनही केले. अंतिम सामना जिंकल्यानंतर विराट अनुष्काच्या गळ्यातपडून आनंदाने रडतानाही दिसला होता.
विराटने अनुष्कासाठी इंस्टाग्रामवर ४ जूनला खास पोस्टही शेअर केली आहे.
त्याने त्यात लिहिले, 'मी १८ वर्षे अनुभवलं आणि ११ वर्षे तिने पाहिलं आहे. आम्ही २०१४ पासून सारखेच क्षण अनुभवले आहेत. थरारक विजयाचे जल्लोष, चिन्नास्वामी स्टेडियमवरील आमच्या चाहत्यांचा गोंगाट हे सेलिब्रेट केले आहे.'
त्याने पुढे लिहिले, 'आम्ही दोघांनीही निश्वास सोडला आहे. ती बंगळुरूची मुलगीही आहे, त्यामुळे तिच्यासाठी हे विजेतेपद आणखी खास आहे. प्रत्येकवेळीच एकत्र राहू.'