Pranali Kodre
भारताचा क्रिकेटपटू विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा हे लोकप्रिय सेलिब्रेटी जोडपे आहे. त्यांना केवळ देशभरातूनच नाही, तर जगभरातून चाहत्यांचे प्रेम मिळत असते.
Virat Kohli-Anushka Sharma
Sakal
सध्या ही जोडी त्यांच्या मुलांसह लंडनमध्ये राहते, पण काही दिवसांपूर्वीच ते भारतात आले आहेत. याचदरम्यान व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून त्यामुळे त्यांच्यावर टीका होत आहे.
Virat Kohli - Anushka Sharma
Sakal
या व्हिडिओमध्ये एका दिव्यांग मुलाला दिलेल्या वागणूकीमुळे सध्या त्यांच्यावर टीका होत असून अनेक युजर्सने त्यांना उद्धटपणा असल्याचे म्हटले आहे.
Virat Kohli Viral Video
Sakal
व्हिडिओत दिसते की विमानतळावर विराटला पाहून एक दिव्यांग मुलगा सेल्फी काढायला येतो पण विराट आणि अनुष्का त्याच्याकडे दुर्लक्ष करत त्यांच्या कारच्या दिशेने जातात.त्यावेळी सुरक्षारक्षक त्या मुलाला मागे खेचतानाही दिसत आहे.
दरम्यान, हा व्हिडिओ विराट आणि अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या भेटीनंतर मुंबई विमानतळावर आल्यानंतरचा असल्याचे म्हटले जात आहे.विराट आणि अनुष्काने भारतात आल्यानंतर नुकतीच वराह घाटावर असलेल्या प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाला भेट दिली होती.
Virat Kohli - Anushka Sharma
Sakal
विराटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील टी२० आणि कसोटी प्रकारातून निवृत्ती घेतली असली, तर तो वनडेत सक्रिय आहे. तो आता ११ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत भारतासाठी खेळताना दिसेल.
Virat Kohli
Sakal
तथापि, त्याआधी विराट विजय हजारे ट्रॉफी २०२५-२६ या देशांतर्गत वनडे स्पर्धेत दिल्लीकडून खेळताना दिसणार आहे. तो १५ वर्षांनी या स्पर्धेत खेळणार आहे.
Virat Kohli
Sakal
न्यूझीलंडविरुद्धची वनडे मालिका सुरू होण्याआधी भारतीय संघातील खेळाडूंना २४ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या विजय हजारे ट्रॉफी २०२५-२६ स्पर्धेतील किमान दोन सामने खेळणे बीसीसीआयने बंधनकारक केले आहे.
Virat Kohli
Sakal
Leonel Messi Handshake and Photo price
Sakal