Pranali Kodre
विजय हजारे ट्ऱॉफी २०२५-२६ स्पर्धेला २४ डिसेंबर २०२५ पासून सुरुवात होत असून या स्पर्धेत विराट कोहलीही खेळणार आहे.
Virat Kohli Vijay Hazare Trophy Records
Sakal
विराट कोहलीचा दिल्ली संघात समावेश असून त्याच्यासह संघात ऋषभ पंत, इशांत शर्मा, हर्षित राणा, नितीश राणा, आयुष बडोनी, नवदीप सैनी अशा खेळाडूंचा समावेश आहे.
Virat Kohli Vijay Hazare Trophy Records
Sakal
विराट २०१० नंतर पहिल्यांदाच विजय हजारे ट्रॉफीमध्ये दिल्लीकडून खेळताना दिसणार आहे. तो शेवटचा सामना फेब्रुवारी २०१० मध्ये सेनादलविरुद्ध खेळला होता.
Virat Kohli Vijay Hazare Trophy Records
Sakal
विराटने विजय हजारे ट्रॉफीमध्ये २००८ मध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर तो या स्पर्धेत १३ सामने खेळला.
Virat Kohli Vijay Hazare Trophy Records
Sakal
विराटने विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत २००८ ते २०१० दरम्यान १३ सामन्यांत ६८.२५ च्या सरासरीने ८१९ धावा केल्या आहेत. त्याने ४ शतके आणि ३ अर्धशतके केली आहेत.
Virat Kohli Vijay Hazare Trophy Records
Sakal
विराटने दिल्लीसाठी विजय हजारे ट्रॉफीमध्ये एका हंगामात सर्वाधिक धावांचा विक्रमही केलेला आहे.त्याने २००९ मध्ये या स्पर्धेत ७ सामन्यांत ४ शतकांसह ५३४ धावा केल्या होत्या.
Virat Kohli Vijay Hazare Trophy Records
Sakal
विजय हजारे ट्रॉफी २०२५-२६ स्पर्धेत दिल्लीचा पहिला सामना २४ डिसेंबरला आंध्रप्रदेशविरुद्ध, तर दुसरा सामना २६ डिसेंबरला गुजरातविरुद्ध होईल. या दोन सामन्यांत विराट खेळण्याची शक्यता आहे.
Virat Kohli Vijay Hazare Trophy Records
Sakal
India T20 World Cup players’ IPL salaries
Sakal