Swadesh Ghanekar
'' १४ वर्षांपूर्वी मी कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदा बॅगी ब्लू रंगाचा पोशाख घातला होता. आज तो प्रवास थांबवोय,'' अशी विराटने पोस्ट लिहिली.
विराट कोहलीने २०११ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी क्रिकेटमधून पदार्पण केले. त्यानंतर कसोटी क्रिकेट त्याने गाजवले.
विराटने ६८ पैकी ४० सामन्यांत विजय मिळवले आणि तो भारताचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार आहे.
विराटने ८१ सामन्यांत कसोटीच्या ७००० धावा पूर्ण केल्या आणि इतक्या वेगाने ७ हजार धावा करणारा तो अव्वल भारतीय ठरला.
कर्णधार म्हणून विराटच्या नावावर सर्वाधिक ७ कसोटी द्विशतकं आहेत आणि त्याने वेस्ट इंडिजच्या ब्रायन लाराचा विक्रम मोडला होता.
२०१६-१७ च्या पर्वात कोहलीने घरच्या मैदानावर १०५९ धावा केल्या होत्या आणि भारतीय फलंदाजाने एका वर्षात घरच्या मैदानावरील या सर्वाधिक धावा होत्या.
२०१४-१५ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर त्याने चार शतकं झळकावली होती आणि तो एकाच परदेश दौऱ्यावर सर्वाधिक शतक झळकावणारा पहिला भारतीय ठरला.
विराटने १२३ कसोटी सामन्यांत ३० शतकं व ३१ अर्धशतकं झळकावली आहेत आणि त्याने ९२३० धावा केल्या आहेत.
विराटला दहा हजार धावा पूर्ण करण्यासाठी ७७० धावा हव्या होत्या आणि हे त्याचे स्वप्न होते. पण निवृत्तीमुळे ते अधुरं राहणार आहे.
मला कसोटीत १०००० धावा पूर्ण करायच्या आहेत आणि हे माझे लक्ष्य आहे. मला ते गाठायचं आहे, असे विराट १२ वर्षापूर्वी म्हणाला होता.