Shubham Banubakode & Shubham Mergu
संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर स्वराज्यावर मोठे संकट कोसळले. रायगड शत्रूच्या हाती पडला आणि राणी येसूबाई व शाहूराजे यांना मोगलांनी कैद केले.
राजाराम महाराजांना महाराष्ट्रात राहणे अशक्य झाल्याने ते आपल्या निवडक सोबत्यांनिशी कर्नाटकातील जिंजी किल्ल्याकडे गेले.
राजाराम महाराज महाराष्ट्र सोडताना स्वराज्याचे कारभार रामचंद्रपंत अमात्याकडे सोपवले. रामचंद्रपंतांनी विशाळगडावर आपली राजधानी थाटली.
विशाळगडावरूनच स्वराज्याचे सर्व सूत्रे हलू लागली. औरंगजेबासारख्या शत्रूशी संघर्षाचे राजकारण इथे चालत असे.
संताजी, धनाजी, नेमाजी शिंदे आदी मराठा वीर येथूनच मोहिमांसाठी निघत आणि मोहिमांची सांगताही येथेच होत असे.
पन्हाळा मोगलांनी जिंकला, पण विशाळगड त्यांना घेता आला नाही. मराठ्यांना विशाळगड अधिक सुरक्षित वाटत होता.
राजाराम महाराजांचा मृत्यू, शिवाजीराजांचा मंचकारोहण सोहळा व ताराबाईंचे वास्तव्य यामुळे विशाळगड पुन्हा एकदा स्वराज्याची राजधानी झाली.
वरील मजकूर हा लेखक जयसिंगराव पवार यांच्या मराठेशाहीचे अंतरंग या पुस्तकावर आधारित आहे.समर्थ रामदासस्वामींच्या शिष्याने केला होता संभाजी महाराजांना वाचावण्याचा प्रयत्न...