Shubham Banubakode
१७व्या शतकात भागानगर प्रांतातून दीक्षित, नवांगुळ, हशमनीस अशी ब्राह्मण कुटुंबे महाराष्ट्रातील बत्तीसशिराळा येथे स्थायिक झाली. त्यापैकीच एकच आप्पाशास्त्री दीक्षित.
आप्पाशास्त्री हे वेदशास्त्रसंपन्न पंडित, ज्योतिषविद्येचे जाणकार आणि मल्लविद्येत निपुण होते. युद्धकलेचेही ते प्रवीण होते, जे त्या काळातील कर्तबगार पुरुषासाठी आवश्यक होते.
शिवाजी महाराजांनी आप्पाशास्त्री यांना बत्तीसशिराळ्यात ज्योतिषी वतनावर नेमणूक दिली. त्यांच्या विद्वत्तेचा आणि शौर्याचा स्वराज्याला लाभ झाला.
महाराष्ट्रात स्थायिक झाल्यावर आप्पाशास्त्री यांचा समर्थ रामदासस्वामींशी संबंध आला. ते समर्थांचे अनुयायी बनले आणि त्यांच्या कार्याचा प्रसार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
समर्थांनी महाराष्ट्रात ११ प्रमुख मारुती मंदिरांची स्थापना केली, त्यापैकी एक शिराळ्यात आहे. या मंदिराच्या स्थापनेत आप्पाशास्त्री यांचा पुढाकार होता.
मुघलांचे सैन्य संभाजी महाराजांना कैद करून नेत असताना बत्तीसशिराळ्याच्या कोटाजवळ मुक्कामाला थांबले. त्यावेळी आप्पाशास्त्री यांनी गावातील लढाऊ लोकांसह मुघलांवर हल्ला केला.
मोगलांचे सैन्य जास्त असल्याने आप्पाशास्त्री आणि त्यांचे सहकारी धारातीर्थी पडले. शेख निजामाने त्यांचा शिरच्छेद केला. हा हल्ला महाशिवरात्रीच्या ४-५ दिवस आधी झाला.
पुढे राजाराम महाराजांच्या कारकीर्दीत आप्पाशास्त्री दीक्षितांच्या वारसदारांना मौजे कणदूर या ठिकाणी इनामी जमीन देण्यात आली.
वरील मजकूर डॉ. जयसिंगरावर पवार यांच्या 'मराठेशाहिचे अंतरंग' या पुस्तकांतून घेण्यात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.