डोळ्यांच्या 'या' 7 गंभीर लक्षणांकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका!

Aarti Badade

दर सहा महिन्यांनी डोळ्यांची तपासणी गरजेची

मानवी डोळा हा अत्यंत संवेदनशील अवयव असून अंधत्वाची अनेक कारणे वेळेत निदान झाल्यास टाळता येऊ शकतात, दर सहा महिन्यांनी डोळ्यांची तपासणी करणे आवश्यक आहे.

Vision problems awareness

|

Sakal

एकाएकी दृष्टी अंधुक होणे

एकाएकी दृष्टी अंधुक होणे, विशेषतः एकाच डोळ्याने स्पष्ट न दिसणे हे मिनी स्ट्रोक, काचबिंदू (Glaucoma) किंवा मधुमेहामुळे होणाऱ्या रेटिनोपॅथी आजाराचे संकेत असू शकते.

Vision problems awareness

|

Sakal

डोळ्यांसमोर काळे ठिपके किंवा जाळे दिसणे

डोळ्यांसमोर लहान काळे ठिपके किंवा कोळ्याच्या जाळ्यासारखे तंतू फिरताना दिसणे आणि अचानक प्रकाशाचे झोत चमकणे ही डोळ्याचा पडदा (Retina) फाटण्याची आणीबाणीची स्थिती असू शकते.

Vision problems awareness

|

Sakal

बाजूच्या गोष्टी पाहण्यास त्रास होणे

तुम्हाला समोरचे स्पष्ट दिसते पण बाजूच्या गोष्टी पाहण्यास अचानक त्रास होत असेल, तर तो डोळ्यांमधील काचबिंदूचा (ग्लॉकोमा) सुरुवातीचा टप्पा असू शकतो.

Vision problems awareness

|

Sakal

एकाच वस्तूच्या दोन प्रतिमा दिसणे

डोळ्याने डबल व्हिजन दिसणे हे कॉर्नियाशी संबंधित दोष किंवा मोतीबिंदूचे लक्षण असू शकते; मात्र दोन्ही डोळ्यांना हा त्रास झाल्यास तो मज्जासंस्थेचा आजार किंवा स्ट्रोकचा इशारा असतो.

Vision problems awareness

|

Sakal

सरळ रेषा नागमोडी किंवा वक्र दिसणे

सरळ रेषा नागमोडी दिसणे किंवा दृष्टीच्या अगदी मध्यभागी मोठा काळा ठिपका दिसणे हे वय-संबंधित मॅक्युलर डिजनरेशन (AMD) या गंभीर आजाराचे मुख्य लक्षण आहे.

Vision problems awareness

|

Sakal

रात्रीच्या वेळी गाडी चालवताना अडचण येणे

उजेडातून अंधारात गेल्यावर डोळे जुळवून घेण्यास वेळ लागणे किंवा रात्री अंधारात स्पष्ट न दिसणे ही रातांधळेपणाची किंवा 'अ' जीवनसत्त्वाच्या कमतरतेची लक्षणे असू शकतात.

Vision problems awareness

|

Sakal

वेळेवर उपचार हाच दृष्टी वाचवण्याचा उपाय

डोळ्यांमधील या कोणत्याही धोक्याच्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता ताबडतोब नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि आपली मौल्यवान दृष्टी कायम सुरक्षित ठेवा.

Vision problems awareness

|

Sakal

पित्ताचा त्रास मुळापासून कसा संपवते 'डाळिंब'!

Pomegranate Benefits for Acidity

|

Sakal

येथे क्लिक करा