Anushka Tapshalkar
नवीन वर्ष म्हणजे नवी सुरुवात. या दिवशी कोणी संकल्प करतो, कोणी आयुष्याला नवं वळण देतो; पण वर्षाची खऱ्या अर्थाने मंगल सुरुवात करायची असेल, तर पुण्यातील प्रसिद्ध मंदिरांमध्ये दर्शन घेणे हा उत्तम मार्ग आहे.
New Year's Spiritual Start
sakal
दगडूशेठ हलवाई गणपती, कसबा गणपती आणि सारसबाग गणपती ही मंदिरे सुख-समृद्धी व नव्या सुरुवातीसाठी अत्यंत शुभ मानली जातात.
Pune Ganesh Temples
sakal
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात बांधलेले चतु:श्रृंगी मातेचे हे पुण्यातील प्रसिद्ध मंदिर ९० फूट उंच असून १०० पायऱ्या चढून जावे लागते.
Chatushrungi Devi Temple
sakal
ओंकारेश्वर मंदिर व पाताळेश्वर लेणी मंदिर ही प्राचीन शिवमंदिरे असून शांत वातावरण, ऐतिहासिक वास्तुकला आणि आध्यात्मिक समाधानासाठी ओळखली जातात.
Shiva Temples
sakal
कोंढव्यातील इस्कॉन मंदिर (NVCC) हे आधुनिक आणि भव्य वास्तुकलेचे उत्कृष्ट उदाहरण असून, शांत व स्वच्छ परिसर, भक्तिमय कीर्तन-प्रवचने आणि श्रीकृष्णभक्तीचा अनुभव देणारे पुण्यातील एक महत्त्वाचे आध्यात्मिक केंद्र आहे.
ISCKON Temple Kondhwa
sakal
पुण्यातील शिवाजीनगरच्या मध्यभागी वसलेलं जंगली महाराज मंदिर शहराच्या गजबजाटातून शांततेचा आश्रय देतं आणि संत जंगली महाराज यांच्या नावाने ओळखले जाते.
Jangali Maharaj Temple
sakal
पर्वती टेकडी मंदिरात प्राचीन देवळांसह पुण्याचे सुंदर विहंगम दृश्य पाहायला मिळते. परिसरातील शांतता व नैसर्गिक सौंदर्य मनाला प्रसन्न करते.
Parvati Hills
sakal
आंबेगाव येथील BAPS स्वामिनारायण मंदिर हे कोरीव काम, भव्य व आकर्षक वास्तुरचना आणि शांत वातावरणासाठी प्रसिद्ध आहे. नववर्षाची सुरुवात करण्यासाठी हे उत्तम पर्याय ठरते.
BAPS Swaminarayana Temple
sakal
नववर्षाच्या दिवशी गर्दी टाळण्यासाठी पहाटेच देवदर्शनाला जा. शांतता आणि समाधान मिळवण्यासाठी हा सर्वोत्तम मार्ग आहे.
Tips for New Year
sakal