Monika Shinde
उच्च हिमालयाच्या पर्वत रांगा, बर्फाच्छादित दृश्ये आणि शांततेचा अनुभव घेण्यासाठी लेह-लडाख एक उत्तम ठिकाण आहे. येथील डोंगर रांगा, शांत सरोवरे आणि सुंदर मठ पर्यटकांना आकर्षित करतात.
"पूर्वेचे व्हेनिस" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उदयपूरचे सरोवर आणि ऐतिहासिक किल्ले येथे पर्यटकांचे स्वागत करतात. येथील ऐतिहासिक ठिकाणे आणि निसर्गाची अनोखी सुंदरता यामुळे हे ठिकाण खास बनते.
उत्तराखंडमधील कुमाऊं विभाग हे निसर्ग प्रेमींकरिता एक स्वर्ग आहे. येथील हिमालय पर्वत, घनदाट जंगलं आणि गोड गोड सरोवरे एक अद्भुत अनुभव देतात.
महाराष्ट्रातील कास पठार ही एक निसर्गाची अप्रतिम किमया आहे. येथील पसरलेली फुलांची गंध आणि रंगसंगती पर्यटकांना हरवून टाकते.
गोवा हे थोडं हटके आणि शांत स्थळ आहे. समुद्रकिनाऱ्यावरील शांती आणि हरा-भरा परिसर यामुळे हे ठिकाण खूप आकर्षक बनते.
हिमालयाच्या कुंडलीत असलेले ऋषिकेश एक शांतता आणि योगनगरी म्हणून प्रसिद्ध आहे. येथील गंगा नदी, योग आश्रम आणि आश्चर्यकारक निसर्ग दृश्ये येथील भटकंतीला अविस्मरणीय बनवतात.
तमिळनाडूतील प्रसिद्ध हिल स्टेशन कोडाइकनाल सुंदर वनस्पती, शांत सरोवर आणि धुक्याच्या लहरींसाठी प्रसिद्ध आहे.
नैनीतालचा "नैनी" सरोवर, डोंगर रांगा आणि फुलांचा सागर पर्यटकांना आकर्षित करतो. येथे निवांत वेळ घालवता येतो.
भविष्यातील नोकऱ्यांसाठी कोणता अभ्यास योग्य ठरेल? जाणून घ्या