Saisimran Ghashi
व्हिटॅमिन B12 लाल रक्तपेशींच्या निर्मितीसाठी आणि मज्जासंस्थेच्या कार्यासाठी आवश्यक आहे.
व्हिटॅमिन B12 च्या कमतरतेमुळे सतत थकवा आणि कमजोरी जाणवते.
कमी B12 मुळे मज्जातंतूंना नुकसान होऊन हात-पायांना मुंग्या किंवा झिणझिण्या येतात.
B12 च्या कमतरतेमुळे लाल रक्तपेशींची निर्मिती कमी होऊन अॅनिमिया होऊ शकतो.
व्हिटॅमिन B12 च्या अभावामुळे ऑक्सिजनचा पुरवठा कमी होऊन चक्कर येण्याची शक्यता वाढते.
B12 च्या कमतरतेमुळे जीभ लाल होणे किंवा जळजळ होणे ही लक्षणे दिसतात.
व्हिटॅमिन B12 च्या कमतरतेमुळे स्मरणशक्ती कमी होणे किंवा एकाग्रता कमी होऊ शकते.
मासे, अंडी, दुग्धजन्य पदार्थ आणि सप्लिमेंट्समधून व्हिटॅमिन B12 ची कमतरता भरून काढता येते.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.