पुजा बोनकिले
हिवाळ्यात बदलत्या वातावरणामुळे रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊ शकते.
यामुळे आहाराची योग्य काळजी घेणे गरजेचे आहे. आहारात पुढील पदार्थांचा समावेश करावा.
हिवाळ्यात रोगप्रतिकाशक्ती वाढवण्यासाठी तूपाचा रोजच्या आहारात समावेश करावा.
अंडी खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. तसेच यामध्ये असलेले व्हिटॅमिन डी रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते.
मशरूममध्ये असलेले पोषक घटक हिवाळ्यात शरीराची रोगप्रतिकाशक्ती वाढवण्यास मदत करतात.
आहारात फॅटी अॅसिडचा समावेश केल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढते.
हिवाळ्यात रोजच्या आहारात दूग्धजन्य पदार्थांचा समावेश करावा.
संत्र्याचा रस सकाळी प्यायल्यास शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत मिळते.
रोजच्या आहारात सुकामेव्याचा समावेश केल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढते.