संतोष कानडे
कॅव्हान्साईट या दुर्मिळ स्फटिकाबद्दल तुम्हाला माहिती आहे का? यापूर्वी हा दगड केवळ अमेरिकेत सापडला होता.
मात्र आपल्या पुण्यातल्या वाघोलीत हे स्फटिक मुबलक प्रमाणात सापडलेलं आहे. परंतु त्यात एक अडचण आहे.
वाघोली इतिहासप्रसिद्ध सरदारांशी निगडीत गाव आहे. येथे मोठ्या प्रमाणावर दगडांच्या खाणी आहेत.
शिवपूर्वकाळ, शिवकाळ, पेशवेकाळ आणि ब्रिटिश काळामध्ये वाघोलीतल्या दगडांचा वापर करुन इमारती उभ्या केल्या.
याच खाणींमध्ये मोरपंखी निळ्या रंगांचे खडक आढळून आले आहेत. हे एक दुर्मिळ स्फटिक असून त्याचं नाव कॅव्हान्साईट आहे.
हे स्फटिक जगामध्ये केवळ वाघोलीत असल्याचा दावा केला जातो. परंतु अमेरिकेतही हे स्फटिक आढळून आलेलं आहे.
महाराष्ट्रामध्ये इतर ठिकाणी विविध रंगांचे स्फटिकं मिळतात, परंतु वाघोलीत आढळलेलं फारच दुर्मिळ आहे.
हे स्फटिक नैसर्गिकरित्या खडक आणि मातीमध्ये आढळून येतात, हे भूगर्भीय प्रक्रियेमुळे तयार होतात.
खाण खोदण्यासाठी स्फोटकं घेतल्याने घरांना तडे पडतात, त्यामुळे खोदकाम तसं बंद असल्याने स्फटिक मिळण्यास अडचण येते.