Sandip Kapde
वाकडेवाडीतील मनोरा पाहिल्यावर तो एखाद्या परीकथेतून बाहेर आल्यासारखा भासतो.
वाकडेवाडीतील हा मनोरा ब्रिटिशकालीन नियोग शिफ शैलीत बांधलेली एक ऐतिहासिक वास्तू आहे.
गार्डन रिच बंगल्यातील पाण्याच्या व्यवस्थेसाठी वाकडेवाडी येथे मनोरा बांधण्यात आला होता.
ब्रिटिश काळात बांधलेला गार्डन रिच बंगला सध्या जहांगीर कुटुंबाच्या मालकीचा आहे.
या मनोऱ्याच्या आजुबाजूला आता अनेक आयटी कंपन्या उभ्या आहेत.
जे जे भाई कुटुंबाने हा बंगला डेव्हिड ससून यांना विकला.
सर अब्दुला डेव्हिड ससून यांच्या नावावर याची शेवटची मालकी होती.
ससून हे इराकमधून भारतात आले होते. त्यांना पुण्याती शांत वातावरण आणि निसर्ग आवडत असे
पुण्यात गार्डन रिच बंगल्यात ते बराच काळ राहत असत
गार्डन रिच बंगला आणि मनोऱ्याचे खास कनेक्शन आहे.
वाकडेवाडीकडे जाताना मनोऱ्याचे बांधकाम लहान किल्ल्यासारखे दिसते.
गार्डन रिच बंगला मुळा-मुठा नदीच्या काठावर पसरलेल्या विस्तीर्ण आवारात आहे.
पुण्यातील गार्डन रिच बंगला एक भव्य गोथिक शैलीत बांधलेले निवासस्थान आहे.
या मनोऱ्यामुळे बंगल्याच्या जलपुरवठा व्यवस्थेतील ऐतिहासिक प्रगतीचे दर्शन घडते.
ससून कुटुंबाने पुणे आणि मुंबईतील अनेक ऐतिहासिक वास्तू उभारल्या आहेत.
वाकडेवाडीचा मनोरा आजही पुण्याच्या औद्योगिक परिसरात उभा आहे.
गार्डन रिच बंगल्याच्या बागेत सासून कुटुंबीय नेहमी बोटींग आणि करमणूक करत असत.
ससून कुटुंबाचा हा बंगला त्यांच्या वैभवशाली जीवनशैलीचे प्रतीक मानला जातो.
गार्डन रिच बंगल्याच्या बागेमध्ये एक आकर्षक फाउंटनही आहे.
ससून कुटुंबाने पुण्यातील आपल्या वास्तूंमुळे सामाजिक आणि सांस्कृतिक प्रभाव निर्माण केला.
वाकडेवाडीचा मनोरा आणि गार्डन रिच बंगला पुण्यातील वास्तुशैलीचे उत्कृष्ट उदाहरण आहेत.