सकाळ वृत्तसेवा
संतोष देशमुख खून प्रकरणातला मुख्य सूत्रधार वाल्मिक कराडची मालमत्ता जप्त होणार आहे.
वाल्मिक कराडच्या नावे असलेली आणि त्याच्या कुटुंबियांच्या नावे असलेली मालमत्ता चार्जशीटच्या माध्यमातून पुढे आली आहे.
वाल्मिक कराडकडे केजमध्ये २५००० चौरस फुटांचा फ्लॅट आणि बंगला आहे, ज्याची किंमत १ कोटी ६९ लाख रुपये आहे.
तसेच दगडवाडीत शेतजमीन किंमत ४८ लाख २६ हजार रुपये, मौजे तंडोळीत १२ हेक्टर शेतजमीन, खरेदी किंमत ६ लाख रुपये
यासह वाल्मिक कराडकडे परळीत ३ हेक्टर शेतजमीन असून खरेदी किंमत २५ लाख रुपये आहे.
कराडकडे परळी रोडवर अंबाजोगाईत ३८० चौरस मीटरचा रहिवाशी बांधकाम असून अंबाजोगाईत ४१९ चौमी रहिवासी बांधकाम आहे.
तसेच कराडचं दगडवाडीत स्टोन क्रशर युनिट असून दगडवाडी गावात ४८ लाखांची शेतजमीनही आहे.
कराडच्या पत्नीची नावे परळीतील वडगावात साडेचार एकर शेतजमीन असून त्याची किंमत १३ लाख रुपये आहे. तसेच वडगावात आणखी एक फ्लॅट असून किंमत दीड लाख आहे.
कराडच्या मुलाच्या नावावर सिरसाळा गावात ५८१ चौ मी खुला प्लॉट आहे. यासह कराडच्या कुटुंबातील इतर मालमत्ता पुढे येण्याची शक्यता आहे.