सकाळ डिजिटल टीम
ऑस्ट्रेलियन जंगलातल्या वॉम्बेट प्राण्याबद्दल एक रंजक गोष्ट कदाचित तुम्हाला माहिती नसेल
वॉम्बेट हा उंदीर, घुशीच्या जातीतला एक प्राणी आहे
हे जनावर आपल्या पार्श्वभागाच्या बळावर दुश्मनाची खोपडी फोडू शकतं
वॉम्बेट हा दिवसभर चरत असतो, अंग खाजवणं ही त्याची आवडीची क्रिया
एखादा जंगली कुत्रा जेव्हा वॉम्बेटवर हल्ला करतो, तेव्हा तो त्याच्या मोठ्या बिळात दडून बसतो
पण तो पूर्णपणे बिळात जात नाही, आपला पार्श्वभाग हा बिळाच्या बाहेरच ठेवतो
कुत्रा जेव्हा बिळात तोंड घालण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा हा वॉम्बट पार्श्वभागाचा वापर करतो
पार्श्वभाग आणि बिळाच्या गॅपमध्ये कुत्र्याचा जबडा अडकवून जोरजोरात रगडतो
यात कुत्र्याचा जबडा आणि खोपडी फुटण्याचा धोका असतो. त्यामुळे वॉम्बटच्या नादाला कुणी लागत नाही