Aarti Badade
काजू, अक्रोड, अळशी व चिया बिया यामध्ये व्हिटॅमिन ई आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. हे मेंदूच्या पेशींचे संरक्षण करतात व विचारशक्ती वाढवतात.
ब्लूबेरी, स्ट्रॉबेरीसारख्या बेरीमध्ये अँटीऑक्सिडंट्स व फायबर असतात. त्या तणाव कमी करून स्मरणशक्ती सुधारतात.
सॅल्मन व तत्सम फॅटी फिशमध्ये भरपूर ओमेगा-३ फॅटी अॅसिड असते, जे मेंदूला ऊर्जा देऊन स्मरणशक्ती वाढवते.
संत्री, आवळा, सफरचंद यामध्ये असलेले व्हिटॅमिन C मूड सुधारते आणि लक्ष केंद्रित करण्यास मदत करते.
बदामांमध्ये ओमेगा-३, व्हिटॅमिन ई आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. दररोज भिजवलेले बदाम मेंदूच्या वाढीस मदत करतात.
अंड्यांमध्ये प्रथिने, कोलीन आणि हेल्दी फॅट्स असतात. हे मेंदूच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत.
ब्रोकोलीमध्ये कोलीन, अँटीऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वे असतात. ही मेंदूच्या स्मरणशक्ती आणि समज वाढवतात.
मुलांना दररोज या सुपरफूड्सचा समावेश असलेला आहार द्या, मेंदू होईल 'सुपर अॅक्टिव्ह'!