Aarti Badade
साधारणतः, केसांच्या प्रकारानुसार तेल लावण्याची वारंवारता ठरवावी. कोरड्या आणि नाजूक केसांसाठी आठवड्यात २-३ वेळा तेल लावणे फायदेशीर ठरते.
तेल थोडे गरम करून लावल्यास ते मुळांपर्यंत पोहोचण्यास मदत होते आणि रक्ताभिसरण सुधारते.
तेल लावल्यानंतर ५-१० मिनिटे सौम्यपणे टाळूची मालिश करा. यामुळे रक्ताभिसरण वाढते आणि केसांच्या मुळांना पोषण मिळते.
तेल १-२ तासांसाठी ठेवणे योग्य. काही लोक रात्रीभर तेल ठेवण्याचा पर्याय निवडतात, परंतु ते सर्वांसाठी योग्य नाही.
नारळ तेल, एरंडेल तेल, आणि रोझमेरी तेल हे केसांच्या वाढीसाठी उपयुक्त ठरतात.
तेल लावल्यानंतर केस पूर्णपणे धुणे आवश्यक आहे. यामुळे टाळूशी संबंधित कोणत्याही समस्या उद्भवत नाहीत.
सतत आणि जास्त तेल लावल्यास केस गोंधळलेले आणि तेलकट दिसू शकतात.