Aarti Badade
कापूर टाळूमधील रक्ताभिसरण वाढवतो, ज्यामुळे केसांची वाढ सुधारते व केस गळती कमी होते.
थोड्या प्रमाणात कापूर घ्या आणि तो बारीक पावडरमध्ये कुस्करून घ्या.
कापूर पावडर नारळ तेल किंवा ऑलिव्ह ऑइलमध्ये मिसळा. हे कॅरियर ऑइल म्हणून उत्तम असते.
कापूरयुक्त तेल टाळूवर ५-१० मिनिटे हलक्या हाताने मालिश करा.
तेल ३० ते ६० मिनिटे टाळूवर राहू द्या जेणेकरून ते खोलवर शिरेल.
कोमट पाण्याने आणि सौम्य शाम्पूने केस स्वच्छ धुवा.
सर्वोत्तम परिणामांसाठी आठवड्यातून १-२ वेळा हे तेल वापरा.
कापूरची अॅलर्जी आहे का ते पाहण्यासाठी त्वचेवर पॅच टेस्ट करणे आवश्यक आहे.
तेलात मिसळल्याशिवाय कापूर थेट टाळूवर लावू नका. त्यामुळे त्वचेला जळजळ होऊ शकते.
हा उपाय नियमित केल्यास केसांची जाडी वाढते आणि गळती कमी होऊ शकते.