Aarti Badade
हाडं कमकुवत वाटतायत पण दूध नकोसं वाटतंय? काळजी करू नका! असे अनेक शाकाहारी पर्याय आहेत ज्यात दुधापेक्षा जास्त कॅल्शियम असतं.
१०० ग्रॅम तिळात सुमारे ९७५ मिग्रॅ कॅल्शियम असतं. ते लाडू, चटणी किंवा सॅलडमध्ये वापरता येतात.
टोफू, सोया मिल्क यामध्ये भरपूर कॅल्शियम असतो. १०० ग्रॅम टोफूमध्ये सुमारे ३५० मिग्रॅ कॅल्शियम असतं.
१०० ग्रॅम नाचणीत ३४४ मिग्रॅ कॅल्शियम. नाचणीची भाकरी, खिचडी वा लाडू खा – हाडं मजबूत करा!
१०० ग्रॅम चिया बियांमध्ये ६३१ मिग्रॅ कॅल्शियम. स्मूदी, ताक, दही किंवा पाण्यात मिसळून घेऊ शकता.
५-६ भिजवलेले बदाम रोज खाल्ल्यास हाडांना लाभ होतो.
बदामांमध्ये इतर सुक्यामेव्यांपेक्षा अधिक कॅल्शियम असतं.
दूध नसेल तरी चालेल! हे शाकाहारी पर्याय तुमचं कॅल्शियम भरून काढतील आणि हाडं मजबूत करतील.