Monika Shinde
जर तुमचे देखील आता बारावीचे शिक्षण पूर्ण झाले आहे आणि तुम्हाला आरजे व्हायचं आहे. तर जाणून घ्या यासाठी काय करावं लागते.
आरजे म्हणजे रेडिओवर गाणी, माहिती, आणि मनोरंजन देणारा व्यक्ती. आरजे होण्यासाठी संवाद कौशल्य, आवाज आणि व्यक्तिमत्व महत्त्वाचे आहेत.
आरजे होण्यासाठी विशिष्ट शैक्षणिक पात्रता आवश्यक नाही. पण पत्रकारिता, मीडिया किंवा कम्युनिकेशनमध्ये पदवी असल्यास जास्त उपयोगी ठरते.
आरजे होण्यासाठी चांगला आवाज असावा लागतो. आवाज स्पष्ट, आकर्षक आणि गप्पा मारायला योग्य असावा लागतो.
आरजे होण्यासाठी चांगले संवाद कौशल्य असणे आवश्यक आहे. श्रोत्यांसोबत बोलताना आपली शैली आणि आवाजाची गती महत्त्वाची असते.
रेडिओ स्टेशन्सवर इंटर्नशिप करून तिथल्या कामाची शिकवण घेणं आणि प्रशिक्षण घेणं गरजेचं आहे.
सोशल मिडियावर तुमचा आवाज, व्यक्तिमत्व आणि टॅलेंट लोकांसमोर आणता येते. यामुळे तुम्हाला रेडिओवर काम करण्याच्या संधी मिळू शकतात.
रेडिओ जॉकी होण्यासाठी तुम्हाला रेडिओ स्टेशन्सच्या ऑडिशनमध्ये भाग घ्यावा लागेल. तुम्ही ऑडिशनमध्ये आपल्या टॅलेंटला दाखवू शकता.
तुम्हाला सतत नवीन शिकत राहावे लागेल. नवीन ट्रेंड्स, गाणी आणि मनोरंजनाच्या प्रकारांबद्दल अपडेट राहा.