Aarti Badade
ब्लूबेरीमध्ये फायबर, व्हिटॅमिन C, व्हिटॅमिन K, मॅंगनीज आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते, जे त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे.
ब्लूबेरीमध्ये आढळणारे अँटीऑक्सिडंट्स अकाली सुरकुत्या, बारीक रेषा आणि त्वचेतील थकल्याची लक्षणे कमी करतात.
ब्लूबेरी कोलेजन नष्ट होण्यापासून त्वचेला वाचवते, ज्यामुळे त्वचा अधिक घट्ट आणि तरुण दिसते.
दररोज एक वाटी ब्लूबेरीसोबत फळे, भाज्या आणि प्रथिनांचा समावेश असलेला संतुलित आहार घेतल्यास, तुमचे वृद्धत्वाचा वेग मंदावतो.
ब्लूबेरीतील अँटीऑक्सिडंट्स शरीरातील पेशींना फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून वाचवतात.
ब्लूबेरीमध्ये असलेले व्हिटॅमिन C आणि E त्वचेला पोषण देऊन ती निरोगी, चमकदार आणि तरुण ठेवतात.
ब्लूबेरीच्या नियमित सेवनाने वृद्धत्वाच्या लक्षणांवर नियंत्रण मिळवता येते आणि त्वचा अधिक काळ टवटवीत राहते.
ही माहिती सामान्य स्रोतांवर आधारित आहे. कृपया कोणतेही उपाय अमलात आणण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.