Aarti Badade
यकृत (Liver) निरोगी ठेवण्यासाठी, तुम्ही काय खाता यावरच नव्हे, तर काय खात नाही यावर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे.
Sakal
तुमच्या दैनंदिन आहारातील काही गोष्टी यकृताचे नुकसान करत असतात. खाण्याच्या सवयीतील योग्य बदल यकृत दीर्घकाळ निरोगी ठेवू शकतात.
Sakal
काय टाळावे शीतपेये (Soft Drinks), सोडा आणि पॅकेज्ड ज्यूस यांसारख्या साखरेच्या पेयांमध्ये भरपूर साखर असते.
Sakal
यकृत ही जास्त साखर सहन करू शकत नाही, ज्यामुळे चरबी जमा होते आणि फॅटी लिव्हरचा धोका वाढतो.
Sakal
याऐवजी पाणी, लिंबूपाणी, चहा किंवा कॉफीचे (साखरेविना) सेवन करा.
Sakal
समोसे, फ्रेंच फ्राईज किंवा तळलेले चिकन यांसारखे पदार्थ कोलेस्टेरॉल आणि फॅट वाढवतात ज्यामुळे यकृतावर हानिकारक परिणाम होतात.
Sakal
चिप्स, कँडी, इन्स्टंट नूडल्स या पदार्थांमध्ये साखर, रिफाइंड पीठ आणि प्रिझर्वेटिव्ह्ज भरपूर असतात. हे फक्त यकृतातील फॅट वाढवत नाहीत, तर लठ्ठपणा आणि मधुमेह यांचा धोकाही वाढवतात.
Sakal
जर तुम्ही हे ३ पदार्थ टाळले, तर तुमचे यकृत दीर्घकाळ निरोगी राहील आणि त्यावरील फॅट कमी होण्यास मदत होईल!
Sakal
Sakal