मेंदूतील धोका! ट्यूमरची चाहूल देणारी सुरुवातीची लक्षणे; दुर्लक्ष केलं तर वाढू शकतो धोका!

Aarti Badade

ब्रेन ट्यूमरची लक्षणे

ब्रेन ट्यूमर (Brain Tumor) हा गंभीर आजार आहे. त्याची लक्षणे अनेकदा सामान्य वाटतात, पण ती ओळखणे खूप महत्त्वाचे आहे.

Brain Tumor Symptoms

|

Sakal

तीव्र डोकेदुखी

डोकेदुखी वारंवार आणि तीव्र होते. विशेषतः सकाळी उठल्यावर ती जास्त जाणवते आणि सामान्य औषधांनीही आराम मिळत नाही.

Brain Tumor Symptoms

|

Sakal

दृष्टी धूसर दिसणे

डोळ्यांवर ताण जाणवणे किंवा वस्तू नीट न दिसणे (Blurred Vision) हे सामान्य आहे. ट्यूमरमुळे दृष्टीवर नियंत्रण ठेवणाऱ्या भागावर परिणाम होतो.

Brain Tumor Symptoms

|

Sakal

संतुलन बिघडणे

चालताना तोल जाणणे किंवा चक्कर येणे (Dizziness) वाढत जाते. मेंदूतील समतोल राखणाऱ्या भागावर दाब निर्माण झाल्याने हे घडते.

Brain Tumor Symptoms

|

Sakal

हात-पाय सुन्न होणे

शरीराच्या एका बाजूला जास्त परिणाम होऊन हात पाय सुन्न (Numbness) होऊ शकतात. वस्तू पकडण्यात किंवा चालण्यात अडचण येते.

Brain Tumor Symptoms

|

Sakal

स्मरणशक्ती कमी होणे

स्मरणशक्ती कमी होणे, मूड अचानक बदलणे, चिडचिड किंवा एकाग्रता कमी होणे ही लक्षणे फ्रंटल लोबवर परिणाम झाल्यास दिसतात.

Brain Tumor Symptoms

|

Sakal

झटके येणे

अचानक हात-पाय थरथरणे आणि नियंत्रण सुटणे हे लक्षण दिसून येऊ शकते. कधी कधी काही सेकंद शुद्ध हरपल्यासारखी अवस्थाही येते.

Brain Tumor Symptoms

|

Sakal

बोलण्यात अडचण

शब्द नीट उच्चारता न येणे किंवा वाक्य नीट बोलता न येणे (Speech Difficulty) हे ट्यूमरमुळे बोलण्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या भागावर परिणाम झाल्यास होते.

Brain Tumor Symptoms

|

Sakal

मळमळ आणि भूक कमी

मेंदूतील दाब वाढल्याने (Intracranial Pressure) मळमळ (Nausea) आणि उलट्या जाणवतात. हे दीर्घकाळ चालल्यास वजनही घटू शकते.

Brain Tumor Symptoms

|

Sakal

किडनी फेल्युअरचा वाढता धोका! CKD कसं हळूहळू शरीरावर ताबा मिळवतं?

Chronic Kidney Disease (CKD)

|

Sakal

येथे क्लिक करा