Anxiety Disoarder म्हणजे काय? मानसिक आरोग्याची ही महत्त्वाची लक्षणं वेळीच ओळखा

Aarti Badade

मानसिक आरोग्याचे दुर्लक्ष

आपण अनेकदा डोकेदुखी किंवा ताप यांसारख्या शारीरिक समस्यांना गंभीरपणे घेतो, पण मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष करतो.वेळेत लक्ष न दिल्यास तीव्र नैराश्य आणि आत्महत्येसारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात.

Sakal

जगभरातील समस्या

WHO (जागतिक आरोग्य संघटना) च्या अहवालानुसार, जगात दर ८ व्यक्तींपैकी १ व्यक्ती मानसिक समस्येशी झुंजत आहे.सुरुवातीलाच लक्षणे ओळखल्यास उपचार करणे सोपे होते.

Sakal

सतत मूड खराब राहणे

पहिले लक्षण: तुमचा मूड खूप काळासाठी खराब राहणे (उदा. सतत उदासी किंवा उदासीनता).जर ही स्थिती दोन दिवसांपेक्षा जास्त काळ टिकली, तर डॉक्टरांशी संपर्क साधा.

Sakal

जास्त चिंता आणि भीती

प्रत्येक छोट्या गोष्टीवर घाबरणे (Panic), सतत बेचैन (Restless) राहणे, किंवा भीतीमुळे दैनंदिन जीवनावर परिणाम होणे.हे चिंता विकाराचे (Anxiety Disorder) महत्त्वाचे लक्षण आहे.

Sakal

झोप आणि भूकेत बदल

मानसिक समस्येचे सामान्य लक्षण म्हणजे झोपेची समस्या (Trouble Sleeping).यात जास्त झोप लागणे किंवा झोप न लागणे. तसेच, खूप भूक लागणे किंवा अजिबात भूक न लागणे.

Sakal

सामाजिक जीवनापासून दूर

मानसिक समस्यांदरम्यान लोक स्वतःपासून, मित्र आणि कुटुंबापासून दूर राहू लागतात.जर त्या व्यक्तीला एकटे राहायला जास्त आवडत असेल, तर ही मानसिक समस्येची सुरुवात असू शकते.

Sakal

लक्ष आणि स्मरणशक्ती कमी

एकाग्रता (Concentration) आणि निर्णय घेण्याच्या क्षमतेवर थेट परिणाम होतो.वारंवार विसरणे (Forgetfulness) आणि गोंधळल्यासारखे (Confused) वाटणे ही सामान्य लक्षणे आहेत.

Sakal

राग वाढणे आणि आत्महत्येचे विचार

राग आणि चिडचिडेपणात वाढ हे मानसिक समस्येचे लक्षण आहे. जगण्याचा काही अर्थ नाही' किंवा स्वतःला इजा करण्याचे विचार येणे ही धोकादायक पातळी आहे. अशा वेळी त्वरित वैद्यकीय मदत घ्या!

Sakal

शुगर असूनही गोडधोड खाल्लंय? रक्तातील साखरेवर नियंत्रण मिळवण्यासाठी हे उपाय करा!

Sakal

येथे क्लिक करा