संतोष कानडे
सध्या सोशल मीडियात इथेनॉलवरुन सरकारवर फारच टीका होताना दिसतेय. विशेषतः इथेनॉल तयार करण्यासाठी भरपूर पाणी लागतं, असंही सांगितलं जातं.
साधारणपणे १ लिटर इथेनॉल तयार करण्यासाठी ४ ते १० लिटर शुद्ध पाण्याची आवश्यकता असते.
पाण्याचे हे प्रमाण इथेनॉल बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कच्च्या मालावर म्हणजे उसाचा रस, मळी, मका किंवा अन्नधान्य यावर अवलंबून असते.
उसाच्या मळीपासून १ लिटर इथेनॉल बनवताना कारखान्यांमध्ये साधारणपणे ४ ते ६ लिटर पाणी लागते.
धान्यापासून म्हणजे मका किंवा तांदळापासून इथेनॉल बनवताना पाण्याचा वापर थोडा जास्त म्हणजेच ६ ते १० लिटर किंवा त्याहून अधिक होऊ शकतो.
जर शेतातील पिकाला लागणाऱ्या पाण्याचा विचार केला तर हा आकडा १००० ते ३००० लिटर इतका प्रचंड होतो. म्हणजे ऊस, मका पिकवण्यासाठी लागणारे पाणी.
इथेनॉल निर्मितीच्या प्रक्रियेत प्रामुख्याने कूलिंग टॉवर्स, स्टीम जनरेशन आणि डायल्युशन यासाठी पाणी वापरले जाते.
१ लिटर इथेनॉल तयार होताना साधारणपणे ८ ते १२ लिटर 'स्पेंट वॉश' बाहेर पडते, ज्याचे व्यवस्थापन करणे आवश्यक असते.
आधुनिक तंत्रज्ञानामुळे आता अनेक कारखाने 'झिरो लिक्विड डिस्चार्ज' पद्धत वापरतात, ज्यामुळे प्रक्रियेतील पाणी पुन्हा रीसायकल केले जाते.
नवनवीन डिस्टिलरी तंत्रज्ञानामुळे कारखान्यांतर्गत लागणाऱ्या ताज्या पाण्याचा वापर आता प्रति लिटर ३ ते ४ लिटरपर्यंत खाली आणण्यात यश आले आहे.
इथेनॉल हे पर्यावरणपूरक इंधन असले, तरी त्याच्या अति-निर्मितीमुळे भूगर्भातील पाण्याच्या साठ्यावर ताण पडू नये म्हणून पाण्याचा कार्यक्षम वापर करणे गरजेचे आहे.