Aarti Badade
साताऱ्यातील ठोसेघर धबधबा पावसाळ्यात आपल्या पूर्ण वैभवात दिसतो. हिरव्यागार पर्वतरांगा आणि धबधब्याचा जोरदार आवाज मनाला मंत्रमुग्ध करतो.
शिवाजी महाराजांचे गुरू समर्थ रामदास स्वामी यांचे समाधीस्थळ सज्जनगड – भक्ती आणि निसर्गाचा सुंदर मिलाफ.
युनेस्को मान्यतेसह प्रसिद्ध झालेले कास पठार – रानफुलांनी बहरलेले महाराष्ट्राचे व्हॅली ऑफ फ्लॉवर्स.
पवनचक्क्यांचा भव्य परिसर आणि थंड वाऱ्याचे आल्हाददायक स्वागत!
३३०० फूट उंचीवरील हा किल्ला मराठ्यांच्या वैभवाची साक्ष देतो. ट्रेकिंग आणि इतिहासप्रेमींसाठी आदर्श ठिकाण.
वाघ, बिबटे, गवे, पक्ष्यांचे वैविध्य – जैवविविधतेचा खजिना असलेले सह्याद्रीचे रक्षण करणारे अभयारण्य.
धुक्याने वेढलेला आणि टेकड्यांचे प्रतिबिंब असलेला कास तलाव – फोटोग्राफर आणि निसर्गप्रेमींसाठी परिपूर्ण.
ठोसेघरकडे जाणाऱ्या रस्त्यांवर डोंगर, झाडं, धुकं आणि पक्ष्यांचे सुरेल गाणं – एक स्वर्गसदृश अनुभव.