Aarti Badade
वटपौर्णिमा म्हणजे पूजनाचा दिवस. पण वडाचा आपल्या आरोग्यावर होणारा सकारात्मक प्रभाव काय आहे, हे माहिती करून घ्यायला हवे.
वडाची पूजा स्त्रिया हजारो वर्षांपासून करत आहेत. पण केवळ धार्मिक कारण नव्हे — त्यामागे वैज्ञानिक कारणंही आहेत.
तुरट चव (कषाय रस), थंड व कोरडा स्वभाव, कफ आणि पित्त शमन करणारा – ही गुणवैशिष्ट्ये वडाला औषधी बनवतात.
मासिक पाळीतील त्रास, पित्त विकार, संधिवात, आमवात आणि केस गळती – या सर्व आजारांमध्ये वडाचे औषधी उपयोग होतात.
वडाच्या खोडाची साल, पाने आणि अंकुर, पानांचे चूर्ण आणि वडाचा चीक हे घटक औषधांमध्ये वापरले जातात.
वडाचा चीक आणि पाने लेप स्वरूपात वापरल्यास सांधेदुखी, सूज आणि जळजळ यावर आराम मिळतो.
वडाच्या पारंब्यांनी सिद्ध केलेले तिळाचे/खोबरेल तेल केसांना लावल्यास केसांची गळती कमी होते. वैद्यकीय सल्ल्यानुसार औषधेही उपयुक्त ठरतात.
वडाच्या अंकुरांचा वापर गर्भाच्या आरोग्यदायी वाढीसाठी केला जातो. पंचवलकल काढा आणि वटजतदी तेल देखील उपयोगी आहे.
वड पूजनीय आहे कारण तो आपल्या जीवनशैलीत शरीराला पोषण, आरोग्य आणि संतुलन देतो.