Yashwant Kshirsagar
तुम्ही टरबूज की खरबूज कोणत्या फळाचे सेवन केले पाहिजे याबद्दल तज्ज्ञांनी सांगितले आहे.
उन्हाळ्यात टरबूज आणि खरबुज दोन्ही फळे जास्त खाल्ली जातात.
टरबुजात 92 टक्के पाणी असते ते शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करते.
खरबुजात जवळजवळ 90 टक्के पाणी असते जे शरीरासाठी चांगले असते.
टरबुजात व्हिटामिन पॉटेशिअम, प्रोटीन, मॅग्नेशिअम, कार्ब्स, आयर्न असते.
या दोन्ही फळांमध्ये फायबर आणि शुगरचे प्रमाण कमी असते.
खरबूज आणि टरबूज दोन्हीही हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. सोबतच यामुळे वजन कमी होते.
टरबूज पचनासाठी चांगले असते तर खरबूज किडनीच्या आजाराचा धोका कमी करते. त्यामुळे दोन्ही फळे आरोग्याला चांगली आहेत.
(सूचना : लेखातील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. सकाळ याची पुष्टि करत नाही. )