सकाळ डिजिटल टीम
नवीन फोन घेण्याआधी 'वॉटरप्रूफ' आणि 'वॉटर रेसिस्टंट' यातील फरक नक्की जाणून घ्या!
आज स्मार्टफोन फक्त कॉलिंग किंवा इंटरनेटसाठीच नाही, तर प्रत्येक कामासाठी महत्त्वाचे बनले आहेत.
आता कंपन्या फोनमध्ये पाण्यापासून बचावाचे फीचर्स देऊ लागल्या आहेत, पण सर्व फोन सारखे नसतात.
वॉटर रेसिस्टंट फोन फक्त हलक्या पावसात किंवा थोड्या पाण्याच्या शिंतोड्यांपासून बचाव करतो. तो पूर्ण पाण्यात बुडाल्यास खराब होऊ शकतो.
या फोनमध्ये एक खास कोटिंग असते, जी थोडे पाणी आत जाण्यापासून थांबवते, पण ती मर्यादित काळासाठीच काम करते.
वॉटरप्रूफ फोन म्हणजे पूर्ण पाण्यात बुडवल्यासही सुरक्षित राहणारा फोन! हे फोन जास्त मजबूत सीलिंगसह तयार होतात.
IP68, IP69 रेटिंग असलेले स्मार्टफोन हेच खरे वॉटरप्रूफ मानले जातात. ते ठराविक वेळ आणि खोलीपर्यंत पाण्यात टिकतात.
IPX4 ते IPX6 रेटिंग असलेले फोन हलक्या पावसासाठी योग्य असतात, मात्र ते पाण्यात बुडवू नका!
स्विमिंग करताना किंवा खूप पावसात फोन वापरायचा असेल, तर IPX7 ते IPX9K रेटिंग पाहूनच फोन खरेदी करा.