Saisimran Ghashi
थंडीत शरीराला उष्णता आवश्यक असते, त्यामुळे काही विशिष्ट पदार्थांचे सेवन टाळले पाहिजे, कारण ते शरीर थंड करतात किंवा पचनासाठी योग्य नसतात.
थंडीत आइसक्रीम, कोल्ड ड्रिंक्स किंवा थंड पाण्याचा जास्त वापर टाळावा. हे पदार्थ शरीराच्या तापमानाला आणखी खाली आणतात आणि सर्दी-खोकल्याची शक्यता वाढवतात.
थंड गुणधर्म असलेले धान्य थंडीत पचनासाठी जड होतात. त्याऐवजी नाचणी किंवा बाजरीसारखे उष्ण गुणधर्म असलेले धान्य खाल्ले पाहिजे.
थंडीत पचन शक्ती कमी असते, त्यामुळे काकडी, टरबूज, खरबूज यासारखी फळे टाळावीत. यामुळे शरीरात थंडावा निर्माण होतो.
हे पदार्थ पचनासाठी जड होतात आणि थंडीत पचन यंत्रणा अधिक धीमी होत असल्याने अपचन, ऍसिडिटी यांचा त्रास होतो.
थंडीत शरीराला उष्णतेची गरज असते, पण प्रक्रियायुक्त मांस किंवा कोल्ड कट्स खाल्ल्यास उष्णतेपेक्षा शरीरात थंडावा तयार होतो, ज्यामुळे इम्युनिटी कमजोर होऊ शकते.
थंडीत उष्ण गुणधर्म असलेले पदार्थ जसे की आलं, लसूण, हळद, बाजरी, नाचणी, सुंठ, गूळ, आणि कोमट पदार्थांचा समावेश करा. यामुळे शरीर उष्ण राहील आणि थंडीपासून संरक्षण होईल.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्य विषयक समस्या असल्यास डॉक्टरांना भेटा.