पायात ही 2 लक्षणे दिसतायत? हृदय कमकुवत झाल्याचे असू शकतात संकेत!

Aarti Badade

हृदयविकाराचा वाढता धोका

आजकाल तरुणांमध्येही हृदयविकाराच्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढत असून शरीर त्याबद्दल काही आगाऊ संकेत देते.

Weak heart symptoms in legs

|

Sakal

पायांमध्ये जाणवणारा अचानक जडपणा

जर तुम्हाला पायात सतत जडपणा जाणवत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका; हे हृदय कमकुवत झाल्याचे लक्षण असू शकते.

Weak heart symptoms in legs

|

Sakal

पायांवर सूज आणि घट्ट होणारे बूट

हृदय रक्ताभिसरण नीट करू शकत नसल्यास शरीरात द्रव साचतो, ज्यामुळे पाय सुजतात आणि बूट किंवा चप्पल घट्ट वाटू लागतात.

Weak heart symptoms in legs

|

Sakal

चालताना पाय दुखणे आणि दम लागणे

हृदयाची क्षमता कमी झाल्यावर थोडे चालल्यावरही पाय दुखणे, धाप लागणे किंवा प्रचंड थकवा जाणवणे अशी लक्षणे दिसतात.

Weak heart symptoms in legs

|

Sakal

हृदय कमकुवत होण्याची मुख्य कारणे

वाढलेले कोलेस्ट्रॉल, उच्च रक्तदाब, मधुमेह, लठ्ठपणा आणि अपुरी झोप हे घटक हृदयाच्या आरोग्यावर विपरित परिणाम करतात.

Weak heart symptoms in legs

|

Sakal

हृदय निरोगी ठेवणारा आहार

हृदयासाठी आहारात हिरव्या पालेभाज्या, फळे, सुकामेवा, मासे आणि कमी फॅट असलेल्या पदार्थांचा समावेश करणे फायदेशीर ठरते.

Weak heart symptoms in legs

|

Sakal

व्यायामाची जोड आणि डॉक्टरांचा सल्ला

दररोज किमान ३० मिनिटे वेगाने चालणे किंवा योगाभ्यास करावा आणि लक्षणे आढळल्यास त्वरित तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Weak heart symptoms in legs

|

Sakal

दही-साखर खाणे आरोग्यासाठी चांगले असते का?

Curd & Sugar Benefits

|

Sakal

येथे क्लिक करा