Sandeep Shirguppe
यंदा मॉन्सून देशात सरासरीपेक्षा आठ टक्के जास्त पाऊस झाल्याचे हवामान खात्याकडून माहिती देण्यात आली.
Weather Update Rain
esakal
मॉन्सूनचा हंगाम संपला असला तरी परतीच्या प्रवासाला यंदा विलंब होणार आहे.
Weather Update Rain
esakal
देशाच्या बहुतांश भागात ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यताही हवामान खात्याने वर्तविली आहे.
Weather Update Rain
esakal
भारतीय हवामान खात्याचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी ऑनलाइन पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली.
Weather Update Rain
esakal
यंदाचा पावसाळा ढगफुटी, भूस्खलन यासारख्या नैसर्गिक संकटांमुळे चर्चेत राहिला. तरीही मॉन्सून हंगाम यशस्वी ठरला.
Weather Update Rain
esakal
पूर्व आणि ईशान्य भारतातील पावसाची सरासरी १३६७.३ मिमी असताना २० टक्के कमी म्हणजेच १०८९.९ मिमी पाऊस झाला.
Weather Update Rain
esakal
बिहार, अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालयात चारपैकी तीन महिन्यांत कमी पाऊस झाला.
Weather Update Rain
esakal
१९०१ नंतर पूर्व आणि ईशान्य भारतात दुसऱ्यांदा सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे.
Weather Update Rain
esakal
वायव्य भारतातील मॉन्सूनची सरासरी ५८७.६ मिमी असून यंदा ७४७.९ मिमी पाऊस झाला.
Weather Update Rain
esakal
वायव्य भारतात २००१ नंतर प्रथमच एवढ्या प्रमाणात पाऊस झाल्याचा उल्लेख हवामान खात्याच्या महासंचालकांनी केला.
Weather Update Rain
esakal