Anushka Tapshalkar
सध्या सगळीकडे लग्नाचे वारे वाहू लागले आहेत. आणि या खास दिवशी प्रत्येक वधूला सर्वात सुंदर दिसायचे असते.
नथ किंवा नथणी हा एक पारंपरिक भारतीय दागिना आहे, जो नववधूच्या सौंदर्याला परिपूर्ण करतो.
परंतु प्रत्येक नववधूच्या नाक टोचलेले असते असे नाही, म्हणून अनेकजणी प्रेस-ऑन नथीचा वापर करतात."
पण काही वेळा प्रेस-ऑन नथ सैल होते आणि वारंवार घसरण्याची भीती असते.
नथ घट्ट ठेवण्यासाठी लॅश ग्लूचा वापर करा. हा सोपा आणि प्रभावी उपाय आहे!
नथीच्या आतील बाजूस लॅश ग्लू लावून नथ नाकात व्यवस्थित घाला. काही सेकंद हलक्या हाताने दाबून ठेवा व नथ एका जागी स्थिर होऊ द्या.
लॅश ग्लू हा वापरण्यास सोपा, सुरक्षित आणि तुमचा खास दिवस वाचवणारा एक प्रभावी उपाय आहे.
हा सोपा उपाय वापरून तुम्ही संपूर्ण समारंभ निश्चिंतपणे एन्जॉय करू शकता.