Weird Animal Habits : प्राण्यांच्या अजब सवयी! 'हा' प्राणी खातो स्वतःची विष्ठा; निसर्गाची ही किमया तुम्हाला माहीत आहे का?

बाळकृष्ण मधाळे

प्राण्यांच्या विचित्र सवयी

निसर्गातील प्राणीविश्व अत्यंत अद्भुत आणि रहस्यमय आहे. काही प्राण्यांच्या सवयी इतक्या विचित्र असतात, की त्या ऐकून आश्चर्य वाटते; पण या सवयी त्यांच्या जगण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असतात.

Animals Weird Habits

|

esakal

गोगलगाय

गोगलगाय धारदार चाकू किंवा ब्लेडवरून अगदी सहजपणे चालू शकते. तरीदेखील तिच्या शरीराला कोणतीही इजा होत नाही. यामागचे कारण म्हणजे तिच्या शरीरातून स्रवणारा ‘म्युकस’ नावाचा चिकट द्रव. हा द्रव तिच्यासाठी संरक्षक कवचासारखे काम करतो आणि धारदार पृष्ठभागापासून तिला सुरक्षित ठेवतो.

Animals Weird Habits

|

esakal

डायक वटवाघूळ

डायक वटवाघूळ (Dayak Bats) हा जगातील एकमेव असा नर प्राणी मानला जातो, जो आपल्या पिलांसाठी स्वतः दूध तयार करू शकतो. ही वैशिष्ट्यपूर्ण क्षमता त्याला इतर प्राण्यांपेक्षा वेगळे ठरवते.

Animals Weird Habits

|

esakal

प्लॅटिपस

प्लॅटिपस हा निसर्गातील सर्वात आगळावेगळा सस्तन प्राणी आहे. तो अंडी घालतो आणि त्याचवेळी आपल्या पिलांना दूधही पाजतो. विज्ञानाच्या भाषेत प्लॅटिपसला ‘मोनोट्रीम’ (Monotreme) असे म्हणतात. हे सस्तन प्राणी असूनही पक्ष्यांप्रमाणे अंडी घालण्याची विशेषता जपून ठेवतात.

Animals Weird Habits

|

esakal

विज्ञानालाही चक्रावणाऱ्या सवयी

निसर्गातील या अनोख्या आणि कधी कधी विचित्र वाटणाऱ्या सवयी केवळ कुतूहल वाढवण्यासाठी नसतात. त्या त्या प्राण्यांना त्यांच्या पर्यावरणाशी जुळवून घेण्यासाठी आणि जिवंत राहण्यासाठी मदत करतात.

Animals Weird Habits

|

esakal

'फॅक्ट्स माइन' अहवाल

‘फॅक्ट्स माइन’ (Facts’ Mine) च्या अहवालानुसार, प्राणी जगतात असे अनेक ‘रूल ब्रेकर्स’ आहेत, जे त्यांच्या अनोख्या गुणांमुळे विज्ञानालाही विचार करायला भाग पाडतात.

Animals Weird Habits

|

esakal

स्वतःची विष्ठा खाणारा ससा!

विशेष म्हणजे, ससे स्वतःची विष्ठा पुन्हा खातात. ही प्रक्रिया ‘नाइट पूप’ म्हणून ओळखली जाते. या विष्ठेमध्ये आवश्यक पोषक घटक आणि जीवनसत्त्वे असतात, जी त्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत गरजेची असतात. त्यामुळे ही सवय त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरते.

Animals Weird Habits

|

esakal

Titvi Bird : स्वत:ची अंडी फोडण्यासाठी टिटवी खरंच पारस दगड वापरते? तो दगड आणते तरी कुठून, अंड्यांमागचं काय रहस्य?

Titvi Bird Eggs Myth

|

esakal

येथे क्लिक करा...