ओला दुष्काळ म्हणजे नक्की काय? कारणे, परिणाम जाणून घ्या

Monika Shinde

दुष्काळ

दुष्काळ हा दोन प्रकारचा असतो. एक कोरडा दुष्काळ म्हणजे पाऊस अजिबात नसणे, आणि ओला दुष्काळ म्हणजे खूप जास्त पावसामुळे नुकसान होणे.

ओला दुष्काळ

अतिपावसामुळे शेतीचे व पर्यावरणाचे मोठे नुकसान होणे म्हणजे ओला दुष्काळ. पिकांमध्ये सड, जमीन फुगवण, आणि शेती अयोग्य होणे यामध्ये येते.

कधी जाहीर होतो?

जेव्हा सरासरीहून खूप जास्त पाऊस होतो (65 मिमीहून अधिक) आणि 33% पेक्षा जास्त पिकांचे नुकसान होते, तेव्हा सरकार ओला दुष्काळ घोषित करते.

मुख्य कारणे

सतत व मुसळधार पावसाळा, निचऱ्याची खराब व्यवस्था, हवामान बदलाचे दुष्परिणाम आणि नद्यांचे पूर हे सर्व ओल्या दुष्काळाला कारणीभूत ठरतात.

पंचनाम्यात काय तपासतात?

पाणी साचलेले शेत, सडलेली व वाहून गेलेली पिके, जमिनीची धूप, मातीचे पोत खराब होणे या गोष्टींची तपासणी केली जाते.

कोणकोणती पिके प्रभावित होतात?

भात, तूर, हरभरा, कापूस, मिरची, सोयाबीन यासारखी पिके कुजतात, मूळासकट उखडतात व पुन्हा लागवड करावी लागते.

नुकसान कोणकोणत्या पातळीवर?

आर्थिक तोटा, वेळ आणि श्रम वाया, उत्पादनात घट, कर्ज फेडणे कठीण आणि त्याच बरोबर मानसिक तणावाने शेतकरी सामोरे जातात

सरकारकडून मिळणारी मदत

कर्जवसुली थांबवली जाते, नुकसानभरपाई मिळते तर काही योजनांमध्ये विमा कवच दिले जाते

१० कोटींचा कुत्रा! असा आहे जगातील सर्वात महागडा पाळीव प्राणी

येथे क्लिक करा