सूरज यादव
व्हेलची उलटी कोट्यवधींना विकली जाते; परफ्युम उद्योगात तिची किंमत हिऱ्यांपेक्षाही अधिक मानली जाते.
whale ambergris
sakal
स्पर्म व्हेलच्या पचनसंस्थेत तयार होणाऱ्या मेणासारख्या पदार्थाला अंबरग्रीस म्हणतात; बाजारात त्याला तरंगते सोने म्हणतात.
whale ambergris
sakal
अंबरग्रीसचा वापर उच्चप्रतीच्या परफ्युममध्ये सुगंध दीर्घकाळ टिकवण्यासाठी नैसर्गिक घटक म्हणून केला जातो.
whale ambergris
sakal
स्पर्म व्हेल कटलफिश, ऑक्टोपस यांसारखे प्राणी खाते; त्यांच्या टोकदार अवशेषांपासून संरक्षणासाठी ही प्रक्रिया घडते.
whale ambergris
sakal
व्हेलच्या पोटात तयार होणारा विशेष द्रव टोकदार अवशेषांमुळे होणारी इजा टाळतो; कालांतराने तो बाहेर टाकला जातो.
whale ambergris
sakal
ताज्या अंबरग्रीसला दुर्गंधी असते; सूर्य, हवा आणि खाऱ्या पाण्यामुळे ऑक्सिडाइज होऊन त्याचा रंग बदलतो.
whale ambergris
sakal
अंबरग्रीस अत्यंत दुर्मीळ असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत तब्बल दीड कोटी रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचते.
whale ambergris
sakal
स्पर्म व्हेल संरक्षित प्रजाती असल्याने शिकार, अंबरग्रीसची विक्री किंवा तस्करी बेकायदेशीर आहे; सापडल्यास वनविभागाला कळवा.
whale ambergris
sakal
The Rise of DJ Culture in India
sakal