Saisimran Ghashi
हनुमान जयंतीला काय टाळावे आणि काय करावे, हे समजून घेणे महत्वाचे असते.
या दिवशी हनुमान चालीसा, सुंदरकांड, हनुमान स्तोत्र किंवा १००८ नावे यांचे पठण केल्याने मानसिक शांती लाभते.
हनुमान जयंतीच्या दिवशी मंदिरात जाऊन हनुमंताचं दर्शन घ्यावं व भक्तिभावाने पूजा करावी.
हनुमंताला आवडणारी फळं, साखर, तूप-गूळ इत्यादी नैवेद्य म्हणून अर्पण करावं.
शरीर, मन आणि घराच्या वातावरणात पवित्रता राखावी. राग, द्वेष, ईर्ष्या टाळाव्यात.
दारू, मांसाहार आणि मादक पदार्थ वर्ज्य करावेत. या पवित्र दिवशी अशुद्ध गोष्टींचा त्याग करावा. संयमित जीवनशैली अंगीकारावी.
शांतता आणि नम्रता हाच खरा भक्तीमार्ग. त्यामुळे भांडण आणि वादविवाद टाळावेत.
हा दिवस धार्मिक दृष्टीने शुभ मानला जातो. यादिवशी केस, नखे कापणे व इतर सौन्दर्यविषयक गोष्टी टाळाव्यात.
धार्मिक परंपरेनुसार सुतकाच्या काळात व महिलांनी हनुमान प्रतिमेला स्पर्श न करणे हे शास्त्रसम्मत मानले जाते.