डांबरगोळी नेमकी कशापासून तयार होते?

संतोष कानडे

डांबरगोळी

डांबरगोळीला इंग्रजीत Mothball म्हणतात. वासामुळे तिला कपड्यात ठेवली जाते.

नॅफ्थलीन

पारंपरिक डांबरगोळ्या प्रामुख्याने नॅफ्थलीन या रसायनापासून तयार केल्या जातात.

पॅराडायक्लोरोबेंझिन

काही डांबरगोळ्यांमध्ये पॅराडायक्लोरोबेंझिन या रसायनाचा वापर केला जातो.

रासायनिक

ही गोळी हवेत हळूहळू विरघळून रासायनिक वायू सोडते.

कीटक

या वायूमुळे कपड्यांना नुकसान करणारे काही कीटक दूर राहतात. शिवाय कपड्यांची दुर्गंधीही जाते.

कपाट

त्यामुळे लोक ती कपाटात, कपड्यांच्या पेटीत किंवा साठवलेल्या वस्तूंजवळ ठेवतात.

डांबर

नावात ‘डांबर’ असले तरी ती रस्त्यावर वापरल्या जाणाऱ्या डांबरापासून तयार होत नाही.

बाष्पीभवन

डांबरगोळीचा वास तीव्र असण्याचे कारण त्यातील रसायनांचे हवेत होणारे बाष्पीभवन आहे.

विषबाधा

नॅफ्थलीनची डांबरगोळी चुकून खाल्ल्यास किंवा मोठ्या प्रमाणात तिच्या वायूच्या संपर्कात आल्यास विषबाधा होऊ शकते.

पाळीव प्राणी

त्यामुळे डांबरगोळी नेहमी मुलं आणि पाळीव प्राणी यांच्यापासून दूर ठेवावी.

मुघलांच्या कनीज आणि बेगम यांच्यात काय फरक होता?

<strong>येथे क्लिक करा</strong>