Monika Shinde
ओवा (Carom Seeds) एक आयुर्वेदिक घटक आहे, जो पारंपरिक उपचारांमध्ये वापरला जातो.
रिकाम्या पोटी ओवा खाल्यामुळे काही फायदे होऊ शकतात पाहूया
ओवा पचनसंस्थेच्या कार्यास मदत करतो आणि अपचन, गॅस, आणि बद्धकोष्ठता यासारख्या समस्यांमध्ये आराम देतो.
ओवा मेटाबोलिजमचे प्रमाण वाढवतो. ज्यामुळे शरीरातील अतिरिक्त फॅट कमी होण्यास मदत होते.
ओवा हाड आणि पेशींच्या मजबुतीसाठी उपयुक्त आहे. यामध्ये खनिज आणि अँटीऑक्सिडंट्स असतात.
ओवा शरीरातील हॉर्मोनल समतोल साधण्यास मदत करतो. जो महिलांसाठी विशेषतः उपयुक्त ठरू शकतो.
ओवा शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करू शकतो. ज्यामुळे शरीराच्या रोगप्रतिकारक क्षमता सुधारते.